Tuesday, November 24, 2009

Farewell Dajji

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो
 
 
नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होतेय अन चंद्र पोरका होतो
 
 
येतात उन्हे दाराशी, हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकत वारा
तव गंधा वाचून जातो
 
तव मिठीत विर्गाल्णाऱ्या मज स्मरती लाघव वेळा
स्वसा विन हृदय अडावे मी तसाच अगतिक होतो
 
तू सांग सखे मज काय मी सांगू ह्या घर दार
समयीचा जीव उदास माझ्यासह मिणमिण मिटतो
 
 
ना अजून झालो मोठा, ना स्वंतंत्र अजुनी झालो
तुझ्या वाचून उमगत जाते, तुझ्या वाचून जन्मच अडतो
 
 
नसतेस घरी तू जेव्हा
नसतेस घरी तू जेव्हा
 
 

 

No comments: